जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या देशीविदेशी दारूची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे २१ हजार ९२५ रूपयांची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारा विनायक देवेश्वर मेश्राम हा सुप्रिम कॉलनीती नाथकृपा कॉम्प्लेक्स येथे देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रविवारी ५ जून रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकून संशयित आरोपी विनायक देवेश्वर मेश्राम (वय-३८) रा. महादेव मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी याला रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून देशीविदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयिताकडून देशी, विदेशी दारूचा एकुण २१ हजार ९२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुधीर सावळे यांच्या फिर्यादीवरून रविवार ५ जून रोजी सायंकाळी संशयित आरोपी विनायक देवेश्वर मेश्राम (वय-३८) रा. महादेव मंदीराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहकॉ योगेश सपकाळे, मिलींद सोनवणे, पोना सचिन पाटील, सुधीर सावळे, पोकॉ सतिष गर्जे यांनी कारवाई केली.