जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणार्या नराधमाला आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भातील माहिती अशी की, अलीकडेच जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचर करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसर हादरला होता. या नराधमाने चिंचखेडा शिवारातील शेतात हे दुष्कृत्य करून पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याची ओळख निश्चीत केली होती. यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकाला गुंगारा देत होता.
अखेर आज दुपारी सुभाष इमाजी भिल ( वय ३५, रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर ) या नराधमाला भुसावळ येथून एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने एलसीबीच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, सुभाष भील याला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.