Home क्राईम जळगावात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

जळगावात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक


जळगाव प्रतिनिधी । शहरातील बहिणाबाई गार्डन जवळ गावठी बनावटीची पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शनीपेठ हद्दीतील राकेश चंद्रकांत साळुंखे उर्फ लिंबु राक्या (वय-२४) रा. कांचन नगर, हा रेकॉर्डवरीन गुन्हेगार आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी शहरातील बहिणाबाई उद्यान परिसरात बेकायदेशीरित्या गावठी बनावटीची पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली. रोहम यांनी पो.ना. विजय पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, पो.कॉ. भगवान पाटील, पो.शि. सचिन महाजन यांचे पथक रवाना केले.

उद्यानाजवळ सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कारवाई करून संशयित आरोपी राकेश साळुंखे उर्फ लिंबु राक्या याला अटक केली. त्यांच्या ताब्यातील १ हजार रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound