Home महिला मलिकांनी अनेक बांगलादेशी मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले ! : भाजप नेत्याचा आरोप

मलिकांनी अनेक बांगलादेशी मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले ! : भाजप नेत्याचा आरोप

0
39

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईडीच्या कोठडीत असणारे मंत्री नवाब मलीक यांचा डान्सबार असून यात अनेक बांगलादेशी मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा सनसनाटी आरोप वादग्रस्त भाजप नेते मोहित कंबोज यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप केले. ते म्हणाले की, नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. मलिक यांनी बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा दावाही कंबोज यांनी केलाय.

मोहित कंबोज म्हणाले की, आम्ही अनेक मुलींची स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिकांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिलीय. हे पुरावे आपण लवकरच तपास यंत्रणांकडे देणार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत.

कंबोज पुढे म्हणाले की, मलिक यांना कुर्ल्यातील लोक आधी फार घाबरायचे. लोक या सार्‍या प्रकरणाबद्दल बोलायचा घाबरायचे. हे प्रकरण फार गंभीर असून मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग आणि देशाविरोधी कारवायांशी संबंध असल्याचा दावा कंबोज यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ नवाब मलिक यांना राजीनामा देण्यास सांगावा, अशी मागणीही कंबोज यांनी केलीय.


Protected Content

Play sound