मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्याची सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईत आपले उमेदवार जाहीर केले आहे. त्यांनी नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहे. सध्या ते अजित पवार गटात आहे. पवारांनी नवाब मलिक यांना त्यांचा मतदार संघ सोडून शिवाजी नगर – मानखूर्द मतदार संघातून निवडणूक लढण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते या मतदार संघात समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना आव्हान देतील.
त्यांची मुलगी सना मलिक या वडीलांच्या अणुशक्तीनगर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पवारांनी उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. सना मलिक या २३ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर २८ ॲाक्टोबरला नवाब मलिक शिवाजी नगर मानखूर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील.