Home Cities धरणगाव माळी समाजाचे युवानेते भैय्याभाऊ महाजन यांची माघार; शिवसेनेला पाठिंबा

माळी समाजाचे युवानेते भैय्याभाऊ महाजन यांची माघार; शिवसेनेला पाठिंबा


dharangaon news11

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील माळी समाजाचे युवानेते महेंद्र गुलाब महाजन यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. महेश उर्फ भैय्याभाऊ महाजन यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.

शहराच्या विकासासाठी आपण शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे भैय्याभाऊ महाजन सांगितले, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेसाठी माघार घेतली असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, भैय्याभाऊ महाजन यांच्या माघारीत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व युवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, भैय्याभाऊ महाजन यांनी माघार घेत पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी यांची बाजू भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी देखील काँग्रेसच्या वतीने शिवसेनेला म्हणजे महाविकास आघाडीच्या घटकाला पाठिंबा जाहीर केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी बापू महाजन, सुभाष महाजन, महेंद्र भोई, साहेबराव महाजन, योगेश वाघ, गणेश महाजन, राहुल रोकडे, योगेश बिऱ्हाडे, नारायण महाजन, पप्पू महाजन, ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound