जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मालदाभाडी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी बाळासाहेब परखड यांची बिनविरोध निवड कार्यालयात नुकतीच पार पाडली.
मालदाभाडी येथील विकास कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात पार पाडली. गेल्या १० वर्षांपासून या संस्थेची निवडणूक ही बिनविरोध होत असून या पंचवार्षिकला सुध्दा या संस्थेची संचालक मंडळाची निवड सुध्दा बिनविरोध झाली आणि आज रोजी चेअरमन म्हणून बाळासाहेब परखड यांची बिनविरोध निवड होऊन त्यांनी हॅट्रीक साधली.
सलग तिस-यांदा ते या संस्थेचे चेअरमन म्हणून बिनविरोध निवडून आलेत. याप्रसंगी व्हाईस चेअरमन श्री. नितीन लोटू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ते प्रथमच या संस्थेच्या संचालक पदावर बिनविरोध निवडून आलेले आहेत. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र तायडे, सहकार अधिकारी यांनी कामकाज पाहिले.
त्यांना डी.व्ही. पाटील,सहकार अधिकारी व सचिव मगरे यांनी सहकार्य केले. निवडीच्या वेळेस संपूर्ण संचालक मंडळ सदस्य सर्व युवराज कापसे, युवराज कापसे, गणेश पालवे, बाबुराव कचाटे, सुरेश घ्यार, नारायण जंगले, पंढरी पाटील, गजानन उंबरकर व शोभाबाई घ्यार, प्रमिला जैन, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड जाहीर केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करुन नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या निवडीबद्दल राजेंद्र पाटील, गजानन नानोटे, आनंद जैन, संजय मुणोत, अमृत पाटील, सुरेश परखड, वासुदेव घ्यार, रमेश पालवे, रंगनाथ पाटील, चंद्रशेखर पाटील, भास्कर पाटील, दामु मालखेडे, प्रभाकर ढाकणे व इतर गावक-यांनी संपूर्ण संचालक मंडळींचे अभिनंदन केले. संस्थेची ही बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.