वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील मोठा माळी वाडा परिसरात राहणाऱ्या एका इन्स्ट्राग्राम आयडी धारकाने एका विशिष्ट धर्माबाबच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्याचा प्रकार रविवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात इन्स्ट्राग्राम आयडी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला मोठामाळी वाडा परिसरातून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, वरणगाव शहरातील मोठा माळी वाडा परिसरात इन्स्ट्राग्राम आयडी धारकाक मोहीत गणेश माळी याने रविवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता त्याच्या इन्स्ट्राग्राम आयडीवर एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह कमेंट टाकली होती. या पोस्ट टाकल्यानंतर संबंधित समाजातील तरूणाने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता इन्स्ट्राग्राम आयडी धारक मोहित गणेश माळी रा. मोठा माळीवाडा वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयित आरोपी मोहित माळी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.