Home Cities जळगाव ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत बनवा फार्मर आयडी

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत बनवा फार्मर आयडी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद व परिणामकारक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार असून, त्याद्वारे विविध योजना व सेवांचा लाभ सुलभतेने मिळेल. भुसावळ तालुक्यात अॅग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली २० जानेवारी रोजी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. या बैठकीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, आणि सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले.

फार्मर आयडीचे फायदे:

पीएम किसान सन्मान योजना
पीक विमा योजना
पीक कर्ज
नुकसान भरपाई अनुदान
हवामान डेटा व मृदा आरोग्य माहिती
पिकांबाबत तांत्रिक सल्ला
याशिवाय शासनाच्या इतर योजनांचा लाभही यामधून मिळणार आहे.

भुसावळ तालुक्यात एकूण २५,४०० शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नोंदणीसाठी तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र आणि CSC चालक यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणीसाठी फक्त आधार कार्ड आणि आधारशी संलग्नित मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. २१ जानेवारीपासून सर्व गावांमध्ये कॅम्प मोडमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन भुसावळ तहसीलदारांनी केले आहे. अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचा शासनाचा हेतू आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सक्रिय सहभाग घेतल्यास त्यांच्या शेतीसाठी नवी दालने उघडतील.

 


Protected Content

Play sound