जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीस वर्षात 45 हजारापेक्षा जास्त सैनिक तसेच नागरिक दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याचे दुःख घेवून भारतीय जगत आहे. वारंवारच्या पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे भारतीय जनता त्रस्त झाली आहे. आणखी किती दिवस शहीदांचे बळी जातील, आता बस्स, पाकिस्तानचे भारतीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, एका सामान्य भारतीय नागरिकाची काय किंमत आहे ते दाखवून देण्यासाठी सशस्त्र सेनेत भरती व्हा, ऑफिसर व्हा, सेनेचे नेतृत्व करा आणि तसेच दहशवादाला जबाबदार पाकिस्तानचे चार तुकडे करण्यासाठी आपले पूर्वज शहीद जवान तसेच नागरिकांच्या मृत्यूचा बदला घ्या असे आवाहन मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळातर्फ़े कांताई सभागृहात शुक्रवारी सोहळा कृतज्ञतेचा हा कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी मेजर जनरल हे दहशतवाद आज, काल आणि आज या विषयांवर ते बोलत होते. व्यासपीठावर केशव स्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष भरत अमळकर , डॉ. प्रताप जाधव, श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांची पुर्णाकृती पुतळ्याची भेट देवुन मंडळातर्फे मेजर जनरल बक्षी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.जाधव यांनी केले. विजय पाटील व सुरज बारी यांच्या तरुणाच्या जाग भारत जाग या स्फुरणगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, विद्यार्थी, तरूणांची उपस्थिती होती. आभार कैलास सोनवणे यांनी मानले.
वीरपत्नींना प्रत्येकी साडे लाखांचा धनादेश
मेजर जनरल जी.डी.बक्षी यांच्या हस्ते पुलवामा हल्ल्यात बुलढाणा येथील शहिद संजय राजपुत , यांचे वीरपत्नी सुष्मा राजपुत यांना 6 लाख 51 हजार चा तसेच मलकापूर येथील शहीद नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना नितीन राठोड यांना 6 लाख 51 ह्जाराचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. बक्षी यांच्या भाषणादरम्यान वंदेमातरम, भारतमाता की जय च्या घोषणांनी सभागृह दणाणले होते. कार्यक्रमाप्रसंगी शहरातील जितेंद्र शिवराम नेहते यांनी 5 हजार, सेवानिवृत्त भगवान हिरामण चौधरी यांनी प्रत्येकी 30 हजार असा 60 हजाराचा तसेच राम दयाल सोनी यांनी 11 हजाराचा मदतीचा धनादेश देवुन देशभक्तिचा प्रत्यय दिला .
वीरतेची परंपरा कायम राहो
दोन्ही हात जोडून बक्षी योंनी जळगावच्या भूमिला नमन करत भाषणाला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील युध्दांचे प्रसंग सांगितले. यावेळी उपस्थितांच्या अंगावर काटे उभे राहिले होते. शहीदांच्या कुटूंबियांना उद्देशून बक्षी म्हणाले की, माझा भाऊ सुध्दा युध्दात शहीद झाला आहे. सहशीलता पाप आहे आणि ते करणारा महापापी आहे. त्यामुळे सहन करु नका, तुमच्या मुलांना सेनेत पाठवा, अधिकारी बनवा व शहिद पूर्वजांचा बदला घेण्यासाठी नेतृत्व करण्यासाठी पाठवा, व दुःख कुणाला दाखवू नका, अश्रू ढाळू नका,. आपली लढाई असून आपण लढू, आपण एकटे नाही, सर्व भारत तुमच्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी शहीदांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढविले. बदला घेवून वीरतेची परंपरा कायम ठेवा असेही त्यांनी सांगितले.
आतले व बाहेरचे दोन्ही शत्रूंनी जनता त्रस्त
भाषणात बक्षी यांनी जेनयूचा विद्यार्थी कैनय्याकुमारचा चांगलाच समाचार घेतला. दहशवाद्याच्या समर्थनार्थ घोषणा देणारा कैन्हय्याकुमार तसेच त्यासारखे मुठभर लोक हे देशाचे शत्रू आहेत. त्याच्यासोबत असलेली दानवसेना यासारखे भारताचे आतले शत्रू तसेच पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे बाहेरचे शत्रू अशा दोन्ही शत्रूंनी भारतीय त्रस्त असून त्यांच्या भारताचे तुकडे झाल्याची शोकांतिका आहे. खरा भारत दिल्लीत नाही तर गावा गावात असल्याचेही ते म्हणाले. असे सांगत चाळीसगाव येथील पाटणादेवी जवळ आपले पुज्य गुरु स्वामी प्रणावानंद सरस्वती यांचे वास्तव्य होते. त्यामुळे जळगाव गुरु भुमी तसेच वीरांची भूमी, वीर मराठ्यांची भूमि असल्याचे गौरवोव्दारही त्यांनी काढले.
पाकिस्तान स्वतःही नीट जगत नाही ना सुखाने भारताला जगू देत, गेल्या 40 वर्षापासून पाकिस्तान भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याला नेहमीप्रमाणे यावेळीया सरकारने एअरस्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकने प्रत्युत्तर दिल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. आता पुन्हा पाकिस्तानने खोडी काढली तर भारतीय सेना सोडणार नाही. असे सांगताना त्यांनी महाभारताचा युध्दाचा श्रीकृष्ण, अर्जुनाचा प्रसंग सांगत प्रत्येक तरुणाने अर्जूनाप्रमाणे भूमिका घेवून तसेच सरकारने एकदाच आर-पारची लढाई करुन पाकिस्तान तसेच दहशतवादाची बिमारी कायमची संपवून टाका, एका शहीदाच्या बदल्यात 10 दहशतवाद्यांना मारुन बदला घ्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच शहीदाची तसेच सामान्य नागरिकाची किंमत नसलेल्या सरकारला मतदानाच्या स्वरुपात बटन दाबून त्यांची जागा दाखवून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.