Home Cities जळगाव खोटे नगरात झाड कोसळल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान

खोटे नगरात झाड कोसळल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान


जळगाव प्रतिनिधी । खोटे नगरातील मयूर हाऊसिंग सोसायटीत निंबाचे झाड कोसळून तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या मयुर हौसिंग सोसायटीत असलेल्या मोकळ्या जागेवर येथील रहिवाशी डॉ. परेश पवार यांच्या मालकी नॅनो कार (एमएच १९ एएक्स ६८९०) व दुचाकी पार्किंगला लावली होती. याच जागेवर सतीश देसले यांच्या स्विप्ट डिझायर कार देखील लावलेली होती. आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मोठे निंबाचे झाड अचानकपणे कोसाळले. यात तिन्ही वाहने दाबल्यागेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. शनीवारी पहाटे दोन तास पावसाने हजेरी लावली होत. यात अनेक झाडे उन्मळून पडले तर काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या होत्या. त्यातची आज सकाळी निंबाचे झाड कोसळल्याने तीन वाहनांचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे.


Protected Content

Play sound