जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीविठ्ठल नगर येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता छापा टाकत ९ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण ३ लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना हरीविठ्ठल नगर भागात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि काही मोटरसायकल यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.

यांनी केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहका अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील आणि पोशि रवींद्र कापडणे यांच्या पथकाने पार पाडली.



