जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर साळुंखे चौक रहिवासी 79 वर्षी महिलेचा उपचार घेण्यासाठी दवाखान्यात रिक्षाने जात असतांना शिवाजी नगर जवळील रेल्वे गेटवर असलेल्या रहदारीमुळे रिक्षाने जात असतांना वाटेतच त्यांच मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवाजी नगर परीसरातील नागरीकांकडून तिव्र संताप व्यक्त होत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगरातील साळुंखे चौकार राहणारे राजेंद्र सुरेश सावदेकर, नितीन सुरेश सावदेकर, यांचे मातोश्री कमलबाई सुरेश सावदेकर वय ७९ यांची दुपारी ३ वाजेच्या सुमारास तब्बेत बिघडली. त्यांना उपचारासाठी शिवाजी नगर मधून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पर्याय रस्ता नसल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुरत रेल्वे गेटवर ट्रॅफिकमुळे जवळपास एक तास उशीर झाल्यामुळे योग्य ते उपचार वेळेत मिळू शकलेली नाही. त्यामुळे आणखी एक निरागस जिवाच्या बळी रेल्वे आणि संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.
यापुर्वी अग्नीशमन बंबाच्या विलंबामुळे अनेकांचा संसार आगीत खाक
शिवाजीनगर उड्डाणपूल १५ दिवसांपासून बंद झाल्यामुळे, गेल्या आाठवड्यात अग्नीशामक बंब वेळीच न पोहचल्यामुळे अनेक गरिबांचे संसार आगीत खाक झाले तर दोन दिवसांपूर्वी वेळीच उपचार न मिळाल्यामुळे एका बालकाला आपले जीव गमवावा लागला. लागोपाठ या आठवड्यांत शिवाजीनगरत या दोन गंभीर घटना घडुनही, प्रशासनासह लोकप्रतिनिधी या घटनांवर साधा शोक व्यक्त करतांना दिसून आले नाही.अनेकवेळा सामाजिक प्रश्नासाठी महासभेत आवाज उठवणारे, पुढे-पुढे करणारे लोकप्रतिनिधी आता गप्पा का ? असा प्रशन सर्व सामान्य जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे. जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांत या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करुन, पूलाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे पूलावरील वाहतुक सुरत गेट मार्गे वाहतुक वळविण्यात आल्याने नागरिकांना दररोज १० किलोमीटरचा फेरा पडत आहे.या फेऱ्यातुन प्रवासा करतांना रस्त्यावरील वाहतुक कोंडी व गेट मध्ये वाहन अडकल्यावर होणाऱ्या विलंबामुळे जळगावकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाजीनगर वासियांचा शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला विरोध नसुन, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जर पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता, तर ‘त्या ’आगीवर नियंत्रण मिळवता आले असते आणि ‘त्या’ बालकाचाही जीव वाचला असता. शिवाजीनगर उड्डाणपूल काहीही करुन होणारचं आहे. मात्र, त्या बालकाचा जीव परत येणार आहे का ? असे असतानांही मतासांठी मतदारांचा पाय पडणारे, त्यांना प्रलोभने दाखविणारे, ऐवढे झाल्यानंतर आवाज उठवतांना का दिसत नाहीत, आताच मौन गिळुन गप्प का? असा सवाल केला जात आहे.