Home Cities अमळनेर महेश नेरपगारे यांचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान

महेश नेरपगारे यांचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश नेरपगारे यांच्या उपक्रमशील कामाची दखल राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने त्यांना नुकताच जळगाव येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे हस्ते रस्कार देऊन सन्मानित केले आहे. गेल्या काही वर्षापासून आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवीत आहेत.

या पुरस्काराबद्दल महेश नेरपगारे त्यांच्या पत्नी यांचे भगीनी मंडळाच्या उपक्रमशील शिक्षीका सौ.रुपाली पवार, संस्थेचे विलास हिम्मतराव पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर, उपशिक्षक माध्यमिक विद्यालय रणाईचे विलास पवार, मुख्याध्यापक मालोजीराव काळू पाटील, माध्यमिक आश्रमशाळा रणाईचे तालुका अमळनेर संस्थेचे कर्मचारी सी.के.पाटील, आर.पी.जाधव, घनश्याम पवार, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक व शिक्षक नेते पी.डी .पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound