पारोळा, प्रतिनिधी | शहरातील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळने पारोळा येथील माहेर असलेल्या सर्व माहेरवाशीण महिलांचे स्नेहसंमेलन आयोजन करून जुन्या मैत्रिला उजाळा देत विचारांची देवाणं घेवाणं करण्यात आली.
लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे शनिवार २ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपुर्ण महाराष्ट्रासह देश विदेशातुन ४००-५०० महिलांची उपस्थित होती. या कार्यक्रमाची सुरूवात सुरेखा बागड, व अध्यक्षा अंजली मुसळे यांच्या हस्ते सरस्वती पुजन दिप प्रज्वलीत करून करण्यात आली. तर वैशाली मालपुरे यांनी स्वागत गीतांने कार्यक्रमची सुरूवात झाली. साधना वाणी व जागृती वरखेडे यांनी विविध भक्तीगितानी कार्यक्रमास खुपच रंगत भरली. सिमा शिरोळे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी सहभागी महिलांनी देखील विविध काव्य रचना, चुटुकले सादर केले. आभार अनिता पाखले यांनी मानलेत. यशस्वीतेसाठी अध्यक्षा अंजली शामकांत मुसळे, सुरेखा रविद्र नावरकर, कल्पना प्रमोद शिरोळे, मनिषा बापु नावरकर, उषा शांताराम शिरूडे, अनिता संजय पाखले, आशा संजय शिरोळे, शकुंतला बाळकृष्ण शिनकर, नलिनी शरद सौजे, वैशाली रविद्र अमृते, अनिता दिपक बागड, संध्या नरेंद्र भामरे, सिमा धर्मेंद्र शिरोळे, मनिषा संदीप बंधान, रत्ना रविद्र शेंडे आदींनी कामकाज पहिले.