Home Cities जळगाव प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीचे भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीचे भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सकाळी काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीमुळे संपूर्ण परिसर घोषणांनी आणि उत्साहाने दुमदुमून गेला असून प्रचाराचा शेवट महायुतीने दमदार पद्धतीने केला.

दिनांक 13 जानेवारी 2026, मंगळवार रोजी सकाळी 9.30 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. निर्मिती फाऊंडेशन, मोहाडी रोड येथून रॅलीचा आरंभ झाला. या रॅलीत महायुतीचे उमेदवार नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर तसेच आधीच बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली पाटील यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीने निर्मिती फाऊंडेशन, लकी प्रोव्हिजन, दत्त मंदिर टेरेसा शाळा परिसर, प्रभाकर अप्पांचे घर, पंतजली शॉप, सोमराज कुमावत यांचे घर, ओमजी घर, सिद्धीविनायक मंदिर मोहन नगर, सतीश सांगडे गल्ली, जय माता प्रोव्हिजन, नित्यानंद नगर बैठक हॉल, राकेश नगर, सतीश तायडे यांचे घर, गाडगेबाबा चौक, 100 फुटी रोड, श्रीराम भरीत सेंटर, मंगलाताई बारी यांचे घर, राजू कोचूर फार्म हाऊस, शंभू राजे हिल पॉईंट, महाजन गॅरेज समोरील गल्ली, शंकर प्राईड, देवेंद्र नगर, संभाजी नगर चौक, राहुल पाटील दवाखाना, बापू पाटील गल्ली, पोस्ट ऑफिस, जय माता दी प्रोव्हिजन, जुना हेमंत क्लास गल्ली, नूतन वर्षा कॉलनी, आशाताई यांचे घर, स्वामी समर्थ केंद्रामागील गल्ली, नोटवाणी गल्ली, आरटीओ ऑफिस, जैसवाल झेरॉक्स गणपती नगर, प्रितम रायसोनी यांचे घर, स्वाध्याय भवन, क्रेझी होम, गणपती रेसिडेन्सी, लंडन शेक, आदर्श नगर एन्ट्री, पंचामृत अपार्टमेंट, चिंचोले हाऊस, सुनील मंत्री यांचा बंगला, ढेकळे हाऊस, शेखर अण्णांचे घर, लायन्स हॉल असा प्रदीर्घ मार्ग पार केला.

संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी दुचाकींवरून घोषणा देत, झेंडे फडकावत आणि जल्लोष करत वातावरण तापवले. नागरिकांनीही ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करत प्रतिसाद दिला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या रॅलीमुळे मतदारांमध्ये महायुतीबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound