नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवर यांनी आज २६ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतून उमेदवारी अर्ज भरणारे ते पहिले उमेदवार आहे. विदर्भातील चंद्रपूर मतदारसंघात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या सुधीर मुनगंटीवर यांच्या समोर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. प्रतिभा धानोरकर हे चंद्रपूरचे दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आहे. सुरेश धानोरकर हे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातून विजयी झालेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. मात्र त्यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिली आहे.
मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे, असे त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र, तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मात्र, आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली. वास्तविक सुधीर त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल, तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना व्यक्त केला.