जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उद्या रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पिंप्राळा येथे होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भवानी मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ वाजता भवानी मंदिर, पिंप्राळा येथून महायुतीच्या सर्व ७५ उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ होणार असून त्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.

या जाहीर सभेस भाजप नेते व राज्याचे पालकमंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, मंत्री ना. गुलाबभाऊ पाटील, केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, खा. स्मिताताई वाघ, माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेश भोळे (राजूमामा), आ. मंगेशदादा चव्हाण, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर अप्पा पाटील, आ. अमोलदादा जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. अमोल पाटील यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार, आरपीआय (आठवले गट) चे अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या सर्व ७५ उमेदवारांसह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. पवार गट) व आरपीआय (आठवले गट) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.



