जळगाव प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या गाळणी कक्षाच्या आवारातून सोमवारी सायंकाळी केबल चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील महावितरणी कंपनीचे गाळणी कक्षाच्या आवारातून दोन चोरट्यांनी इलेक्ट्रिक डीपीला लागणारे केबल चोरून नेत असतांना महावितरण विभागाच्या कर्मचारीच्या लक्षात आल्याची २७ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार लक्षात येताच सहाय्यक अभियंता संदीप निरंजन, मुख्य तंत्रज्ञ अतुल मार्कड, तंत्रज्ञ निलेश पर्वतकर, प्रधान तंत्रज्ञ हिरासिंग चौहाण यांनी दोन्ही चोरट्यांचा पाठलाग केला. चेतन केशव साळुंखे रा. सदगुरू नगर, अयोध्यानगर असे संशयित चोरट्यांचे नाव असून रात्री उशीरा अटक केली. अधिक चौकशी केली असता दुसरा संशयित आरोपी बाळु सैदाणे असल्याचे सांगितले. त्यालाही आज दुपारी अटक केली. सहाय्यक अभियंता संदीप निरंजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, विजय बावस्कर, सचिन पाटील , मुकेश पाटील यांनी केली आहे यांनी कारवाई करून अटक केली आहे.