पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे नुकतेच चाळीसगाव येथून बदली होऊन आलेले सहाय्यक अभियंता भरत उकळकर यांनी शासनास आपल्या बदली संदर्भात विनंती अर्ज करून पाचोरा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता भरत उकळकर यांन आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
त्यांचा पाचोरा तालुका संपूर्ण परिचयाचा असून त्यांनी यापूर्वी पाचोरा विभागात काम केले असून त्यांना कामाचा चांगला अनुभव तसेच कुठे काही अडचणी असल्यास त्यांना माहिती असल्यामुळे त्यांना या तालुक्यात विज समस्येबाबत तसेच कुठे मोठा फॉल्ट झाल्यास ताबडतोब काम करून ती लाईन तात्काळ कशी चालू करावी या त्यांच्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर त्यांची पाचोरा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांनी अगोदर दहा वर्ष पाचोरा विभागात काम केले असून कजगाव, नेरी, पाचोरा ग्रामीण येथे कनिष्ठ अभियंता म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मागील काळात त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाकडून कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी येणारा पावसाळा लक्षात घेता नागरिकांना विद्युत पासून वंचित राहू नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. वेळोवेळी नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कामे करा.
भरत उकळकर यांच्याकडे पाचोरा शहर भडगाव रोड भाग असून त्यांनी ग्राहकांना योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांची नाळ पाचोरा शहराशी जोडली असून त्यांनी जास्तीत जास्त कामे करुन विज पुरवठा सुरळीत कसा राहील यावर भर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही बोलुन दाखविले आहे. त्यांचे पाचोरा तालुका पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते अनिल (आबा) येवले, पत्रकार नंदकुमार शेलकर, फईम शेख, सेवानिवृत्त अधिकारी नंदलाल बोदडे, सेवानिवृत्त महावितरण अधिकारी, हरीश आदिवाल, सेवानिवृत्त कर्मचारी, रुपेश चव्हाण, किशोर काशिनाथ पाटील, जितेंद्र माळी, रवींद्र माळी, पवन चौधरी, निलेश सुरवडकर, रामेश्वर राठोड, राहुल महाजन, संदीप मराठे, ज्ञानेश्वर राठोड, नामदेव नाईक यांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.