यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला असून महा विकास आघाडीचा ‘उबाठा’ या घटक पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील आणि विविध प्रभागातील आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात प्रभावी पकड निर्माण केली आहे. मतदारांमध्ये वाढता प्रतिसाद आणि घरोघरी संपर्कामुळे आघाडीच्या पथकाने निवडणूक मैदानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे प्रचार दौरे सलग सुरू असून उमेदवार मतदारांना भेटत आपली भूमिका आणि विकासाची दिशा स्पष्ट करत आहेत. शहरातील विविध प्रभागांत नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांचा आणि तरुण मतदारांचा विशेष सहभाग दिसून येतो. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील विविध सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना मांडत नागरिकांच्या अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी आणि माजी तालुकाप्रमुख कडू पाटील यांनी निवडणुकीतील वातावरणाचा आढावा घेतला. त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, यावल नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा मजबूत कल दिसून येत आहे.



