मुंबई प्रतिनिधी । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिवसेनेचे मंत्री, नेत्यांची बैठक बुधवारी वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या काही महिन्यांमध्ये औरंगाबाद मनपाची निवडणूक आगामी काळात होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ जागा जिंकल्या होत्या. तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या विजयरथाला रोखणे शक्य असल्याचे दिसून आल्यामुळे आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचे या बैठकीत ठरले. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याचे बैठकीत ठरले असून असून मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.