जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था, अयोध्या नगर संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळेला समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमा पूजन केले. प्रसंगी उद्योजक संतोष इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रविषयी माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्या भिडेवाड्याची परिस्थिती खूपच खराब आहे. सरकारने नुकतेच भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे. त्यासाठी निधी देऊन त्याचे काम वेगाने सुरू ठेवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमा वेळी वसंत महाजन, संतोष इंगळे, नंदू पाटील, प्रशांत महाजन, जयंत इंगळे, सुभाष माळी, गजानन इंगळे, प्रभाकर महाजन, हेमंत महाजन, हर्षल इंगळे, प्रकाश महाजन, प्रशांत माळी यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.