Home Cities अमळनेर अमळनेरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात

अमळनेरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील वंचित घटक, शेतकरी आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या फुले यांच्या कार्याचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश यावेळी देण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणारे आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळख असलेल्या महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि संत सावता माळी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक भिमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, प्रा. अशोक पवार, श्रद्धा रेखा राजेंद्र, गणेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर, पांडुरंग महाजन, महेंद्र महाजन, योगेश महाजन, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. कुंदन साळुंखे, कैलास महाजन, अशोक महाजन, चित्रकला महाजन, प्रा. प्रकाश महाजन, संदीप महाजन, हेमंत महाजन, जितेंद्र महाजन यांसह विविध पदाधिकारी, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समरसता, बंधुभाव आणि शिक्षणाच्या प्रसाराचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर “सार्वजनिक सत्यधर्म” ग्रंथ हाती घेऊन फुले प्रेमींनी उत्साहात छायाचित्रे काढत जयंतीचा आनंद साजरा केला.


Protected Content

Play sound