
मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी उत्सव समितीद्वारा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.यात ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर यंदा महर्षी वाल्मिकी उत्सव तसेच मिरवणूक रद्द करुन आपली सामाजिक जपली आहे.

यावर्षी साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिकी जयंती पूजन करून साजरी करण्याचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला समाजातील सर्व मान्यवरांनी पाठिंबा दिला. या ठरावानुसार यावेळी केवळ महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशा प्रकारे समाजबांधवानी साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. दिवाकर पाटील, डॉ. दिलीप तायडे, माजी प्राचार्य उमाकांत सूर्यवंशी, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज कोळी, चंद्रकांत भो़लाणे, ऍडव्होकेट संतोष कोळी, भगवान भोलाणे, उमेश कोळी, सुरेश कोळी , रामधन कोळी, अशोक कांडेलकर निमखेडी, सुकलाल कोळी, संजय कांडेलकर, माजी नगरसेवक संतोष कोळी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, भास्कर कोळी, गणेश कोळी, संजय बावस्कर, खिरोळकर आप्पा, शुभम तायडे, विष्णू कोळी, दीपक कोळी, गौरव कोळी, गौरव कोळी, संजय मधुकर कोळी तथा समाजातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



