मुंबई (वृत्तसंस्था) अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राने याआधी अशा पद्धतीचे सुडाचे राजकारण पाहिले नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केले आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचे केले आहे असेच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झालं आहे ? देव माफ करु शकतो, पण ईडी नाही.