Home राजकीय महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक नाही : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक नाही : मुख्यमंत्री


नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होणार,या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. ते नागपुरात बोलत होते.

महाराष्ट्राची विधानसभा आज रात्री बरखास्त होणार आणि अनेक दिवसांपासून सुरू होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाष्य केले. लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे दावे गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची विधाने केली होती. दरम्यान, आज सकाळपासून लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होणार,या चर्चेला उधान आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound