मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या लसीकरणाला वेग आलेला असतांनाच आता राज्यातील लसीकरणाने १० कोटींचा महत्वाचा टप्पा पार केला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राने आज करोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की- महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचार्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो.
महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडले अभियान राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आता राज्याने दहा कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून येत आहे.