यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे बोराळे ग्रामपंचायतच्या वतीने मातृभुमीच्या स्वाधीनतासाठी आपले संपुर्ण जीवन बलीदान करणारे विरता, पराक्रमा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतिक महायोद्धा महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले आहे.
बोराळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत हे होते , याप्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस बोराळेच्या पोलीस पाटील माधुरी राजपुत , आशा सेविका सुनयना राजपुत, कैलाससिंग राजपुत , नितिन राजपुत , अनिल वानखेडे, गणेश राजपुत , संजयसिंग राजपुत आणी गावातील ईतर समाज बांधवांनी उपस्थित राहुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी सर्व उपास्थितांचे आभार मेघराजसिंग राजपुत यांनी मानले, त्याचप्रमाणे चुंचाळे गावात देखील भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी चुंचाळे गावातील ग्राम पंचायत सदस्य सुकलाल पाटील , संजय तडवी , अनिल कोळी , पत्रकार विकी वानखेडे , पत्रकार दिपके नवे पवन पाटील , शुभम राजपुत ,रतिलाल राजपुत , ऋषिकेष पाटील , उमेश पाटील , संगणक परीचारक भुरा कोकी आदी उपस्थित होते.