बोदवड प्रतिनिधी । बोदवड शहरात महाराणा प्रताप याची नुकतीच ४७९ वी जयती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजा प्रमानेच महाराणा यांनी देखील देशासाठी मोलाचे कार्य केले.
जंयती समितीचे अध्यक्ष डॅा. सागर पाटील, उपापाध्यक्ष अनुपसिंग हजारी, करनी सेना युवा जिल्हाध्यक्ष गणेशसिंग पाटील, नगरसेवक डॅा. सुधिर पाटील, नगरसेवक दिपजी झाबंड, युवराजसिंग परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील, जनसेवक विनोद पाडर, सतोंषसिंग राणा, सचिन राजपुत, डॅा. धंनजय राजपुत, मंगलसिंग पाटील, यु.बी. पाटील, अतुल पाटील, नाना पाटील यांच्यासह सर्व समाजातील समाजबांधव उपस्थित होते. सुरुवातीला महाराणा प्रताप याच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर तरूणांनी बोदवड शहरातुन बाईक रॅली काढली. तर सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.