Home धर्म-समाज सांगवी येथे महाराजस्व समाधान शिबिर : नागरिकांना दिलासा

सांगवी येथे महाराजस्व समाधान शिबिर : नागरिकांना दिलासा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास’ परिसरातील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामुळे नागरिकांच्या महसुली कामांना गती मिळाली.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सांगवी, तालुका यावल येथे २२ जुलै रोजी संपन्न झाला. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर होत्या. त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी भरत वारे आणि इतर विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे नागरिकांची विविध कामे एकाच छताखाली मार्गी लागली.

आमदार अमोलभाऊ जावळे यांना अपरिहार्य कारणास्तव या शिबिरास उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांचे प्रतिनिधी म्हणून परिसरातील मान्यवर उपस्थित होते, ज्यात भालोदचे प्रगतिशील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण चौधरी, किरण महाजन, भूषण नेहते, भरत पाटील उपसरपंच, अतुल फिरके, योगेश भंगाळे, सागर कोळी, डिगंबर खडसे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटील (ग्राममहसूल अधिकारी, डोंगर कठोरा) यांनी केले, तर उपस्थितीतांचे आभार हेमा सांगोळे (ग्राममहसूल अधिकारी, अट्रावल) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू गोरटे (ग्राममहसूल अधिकारी, सांगवी बु.) आणि सागर तायडे (महसूल सेवक, सांगवी बु.) यांनी परिश्रम घेतले. तसेच, मंडळातील सर्व ग्राममहसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी अमूल्य सहकार्य केले.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महसूल विभागातील गुंतागुंतीच्या बाबीदेखील सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. ‘अंत्योदय हेच ध्येय आहे’ हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. आमदार अमोलदादा जावळे यांच्या ‘समस्या संकलन – कार्यवाही – समाधान’ या कार्यप्रणालीचा अवलंब करून शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवायची आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डोंगरकठोरा येथील लच्छमन बारेला या दिव्यांग लाभार्थीला तर तातडीने मंचावरूनच मंजुरी आदेश देऊन लाभ देण्यात आला, जे या शिबिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.


Protected Content

Play sound