खामगाव प्रतिनिधी । महाराजा श्री अग्रसेन महाराज जयंती उत्सवाची आज २ ऑक्टोबर रोजी येथील अग्रसेन भवन मध्ये सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करून रक्तदान शिबिराने सुरुवात करण्यात आली आहे.
समाजसेवेत सदा अग्रेसर असलेल्या समाजातील महिला व पुरुष रक्तदात्यांनी सकाळी दहा वाजता आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला. महाराजा अग्रसेन जयंती महोत्सव शनिवार 2 ऑक्टोबर ते गुरुवार 7 ऑक्टोबर दरम्यान येथील अग्रसेन भवन ,बालाजी प्लॉट, खामगाव मध्ये आयोजित करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची खबरदारी लक्षात घेता साध्या पद्धतीने महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज शनिवारी सकाळी नऊ वाजता विजय अग्रवाल(वर्णावाले) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 46 पुरुष व 5 महिला भगिनींनी असे एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल तसेच अकोला डायग्नोस्टिक सेंटर ब्लड व कंपोनेन्ट सेंटर, अकोलाच्या वैद्यकीय पथकाने सहयोग दिला. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी श्री अग्रसेन भवन मंडळ, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती, अग्रवाल युवक मंडळ, अग्रवाल महिला मंडल, अग्रवाल बहूबेटी मंडळ च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती अग्रवाल युवक मंडळ, खामगांवचे जनसंपर्कमंत्री पियुष अग्रवाल यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.