दहिगावातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनेक वर्षाचा इतिहास असलेल्या यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा आषाढी एकादशी निमित्ताने यात्रोत्सव होणार असून यात भाविकांसाठी ११ क्विंटल साबुदाणा फराळ सह रूग्णासाठीचे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.दहिगाव तालुका यावल येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसांचे उपचाराचे निदान व्हावे या दृष्टीकोणातुन गोदावरी हॉस्पिटल साकेगाव यांच्या वतीने मोफत रोग निदान शिबीर घेण्यात आला आहे. सदर दर्शनासाठी जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार १९९८ मध्ये करण्यात आले होते.

सदर मंदिराची उभारणी करण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेश पाटील त्यांचे सहकारी हेमराज गंभीर महाजन, कैलास पाटील, कै. प्रकाश सोनार, रामदास पाटील, श्रीपत माळी यांचे सह अनेक गावकऱ्यांनी महाराष्ट्र पिंजून लोकवर्गणीतून भव्य अशी मंदिराची उभारणी केली १९९८या वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आले असुन,या जिर्णोव्दाराचे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वर्धापन दिन सोहळा आणी यात्रोत्सव ही साजरा करण्यात येतो. दहिगाव येथील मंदिरास प्रति पंढरपूर मानले जाणारे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. यात श्री संत तुकाराम महाराज हनुमान गणपती यांचे सह सर्व देवतांचे चित्ररूपात रंगवण्यात आलेले आहे. त्यामुळे या मंदिरास प्रति पंढरपुराची उपमा देण्यात आलेली आहे.

दरवर्षी जिल्हाभरातून अनेक गावागावातून पायी दिंडी सोहळा येथे येतात आणि भावगीतांनी सारा दहिगाव परिसर हे भक्तीमय वातावरणात हजारो भाविक येथे येऊन माऊलीचे दर्शन घेत असतात. यात्रोत्सवानिमित्ताने सकाळी पाच वाजेपासून पूजेला सुरुवात होणार आहे. या पूजेत सात जोडप्यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे असुन यात साक्षी गौरव पाटील,लक्ष्मी सागर गायकवाड,महिमा नरेंद्र पाटील, हितेश्वरी अमोल पाटील, तृप्ती सागर पाटील, रूपाली योगेश महाजन , योगेश्वरी कुंदन पाटील,जोडप्यांच्या हस्ते होम पूजा करण्यात येईल हजारोच्या संख्येने भाविकांनी येऊन माऊलीचे दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्ट चे सर्व सेवेकरी संचालक आणि हरिभक्त परायण भजनी मंडळ दहिगाव यांनी केले आहे.

Protected Content