मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तेली समाजबांधवांतर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवा निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आज याची सांगता झाल्याचे औचित्य साधून मुक्ताईनगर मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाप्रसादाचा दोन ते अडीच हजार लोकांनी लाभ घेतला असून सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दिली.
तसेच मुक्ताईनगर तेली समाजातील पदाधिकार्यांनी ह्या वेळेस संपर्क करून जळगाव जिल्ह्यातील तेली समाज तंटामुक्ती समिती कार्य करण्याची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीमध्ये तेली समाजाच्या वतीने विभक्त राहणारे मुला मुली तसेच घरगुती भांडणांमध्ये भावाभावांमध्ये वाद असल्यास ही समिती त्यांचा वाद मिटवण्याचे काम करत असते तसेच मुक्ताईनगर मधील काही तक्रारी असल्यास त्यांनी या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे असे बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले. तसेच मुक्ताईनगर मधील तेली समाजाच्या मध्ये जेवढे ही तक्रारी असल्यास आम्ही त्यांचे निवारण करून देऊ अशी ग्वाही जळगाव जिल्ह्यातील समाज तंटामुक्ती समिती कार्यकारणी यांनी आज संताजी महाराज जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या कार्यक्रमांमध्ये दिली.
या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील समाज तंटामुक्ती कार्यकारिणी सदस्यांपैकी श्री दत्तत्रय तुकाराम चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव, संतोष सोनू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, अनिल रामदास चौधरी जिल्हा सचिव जळगाव, अशोक नामदेव चौधरी जिल्हा सहसचिव भुसावळ, भागवत माणिक चौधरी जिल्हा संघटक प्रमुख जळगाव, डॉक्टर मणिलाल दौलत चौधरी जिल्हा संघटक प्रमुख जळगाव यांची अनमोल साथ लाभली.
तसेच मुक्ताईनगर येथून अशोक मोरेश्वर बोराखेडे, विठ्ठल कडू तळेले अध्यक्ष तेली समाज मुक्ताईनगर यांचे नेतृत्व खाली, पुरुषोत्तम काशिनाथ खेवलकर, लक्ष्मण बोराखेडे, रामदास काठोके, सुरेश मांडवाले; सुधाकर सापधरे, रविंद्र तळेले, शामराव तळेले; संतोष सुरेश जावरे, प्रकाश तळले; सुरेश पांडुरंग नायसे, पंडित तळेले, शशिकांत गलवाडे, मनोज तळेले लक्ष्मण सापधरे, अशोक नारायण सापधरे, योगेश मनसुटे यांची उपस्थिती होती.
तसेच सर्व तेली समाजाच्या बालगोपाळांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनी कार्यक्रमाला हातभार लावला व सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली. यावर्षी मिळालेली अनमोल साथ पुढच्या वर्षी सुद्धा अशीच लाभो अशी आशा तेली समाजाचे अध्यक्ष विठ्ठल तळेले यांनी व्यक्त केली.