जळगाव प्रतिनिधी । हुडकोच्या कर्जफेडीसाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातून देण्यात आली आहे.
महापालिकेवर हुडकोचे सुमारे ३५० कोटींचे कर्ज आहे. यासाठी हुडकोला दर महिन्याला तीन कोटींचा हप्ता भरावा लागत आहे. याबाबत वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे उपस्थित होते. महापालिकेवरील हुडकोचे कर्ज आणि त्या कर्जाची परतफेड तसेच कर्जापोटी शासनाला द्यायचे हमी शुल्क या दोन्ही विषयांवर निर्णय घेण्यासाठी येत्या १५ दिवसात महापालिका, हुडको व शासन यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय या वेळी झाला.