जामनेर प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या ७ तारखेला जामनेरात आगमन होणार असून त्या यात्रेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याचबरोबर मागण्याचे व समस्यांचे लेखी निवेदन मुख्यमंत्री यांना देणार असल्याची माहिती संजय गरूड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुक ईव्हीएम मशीनऐवजी मत पत्रिकेवर मतदान घ्यावी, अशी मागणी गरूड यांनी केली आहे. या सरकारने कर्जमाफी, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती व पुनर्वसन, चारा छावणी, शिष्यवृत्ती असे अनेक प्रश्न फक्त कागदावरच राबविले आहेत. प्रत्यक्षात अमलात मात्र आलेले नाही, असा आरोप करीत स्थानिक मुद्दे उपस्थित करत ना. महाजनांनी नारपार, भागपूर, तापीचे पाणी वळवू असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, डॉ.ऐश्वर्यी राठोड, प्रल्हाद बोरसे, डॉ.प्रशांत पाटील, विशाल पाटील आदी उपस्थितीत होते.