जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने आज जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला.
जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर आनंदौत्सव साजरा करताना आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल अरविंद देशमुख, अमोल पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अरविंद देशमुख यांनी जी.एम. फाउंडेशनचे कार्यालयातच पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय सुरु होईल, अशी माहिती दिली.