Home आरोग्य हृदयविकाराच्या रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ‘कार्डियाक केअर’ सुविधा

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ‘कार्डियाक केअर’ सुविधा


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । वाढते प्रदूषण, धावपळीची जीवनशैली आणि वाढत्या मानसिक ताणतणावामुळे हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव येथील महादेव हॉस्पिटल मधील ‘सुपर स्पेशालिटी’ विभागात हृदयरोग रुग्णांसाठी विशेष अद्ययावत तपासणी सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हृदयविकाराचे निदान वेळेवर होणे अत्यंत आवश्यक असते. महादेव हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात रुग्णांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रमुख चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील सुविधांचा समावेश आहे: हृदय तपासणी: ईसीजी (ECG), २डी इको (2D Echo) आणि टीएमटी (TMT) यांसारख्या अत्याधुनिक चाचण्या. पॅथॉलॉजी लॅब: सीबीसी (CBC), रँडम बीएसएल, लिपिड प्रोफाईल आणि एचबीए 1 सी (HbA1c). तसेच किडनी फंक्शन टेस्ट (KFT) सारख्या आवश्यक तपासण्यांची उपलब्धता. केवळ तपासणीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार रुग्णांवर अद्ययावत शस्त्रक्रिया देखील येथे केल्या जात आहेत. विशेष हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमद्वारे रुग्णांना अचूक निदान आणि प्रभावी उपचार मिळण्यास मदत होत आहे. हृदयविकाराची कोणतीही लक्षणे जाणवल्यास विलंब न करता तपासणी करणे गरजेचे आहे. तरी गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे तपासणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound