दिवाळीत फटाके फोडताना विद्युत यंत्रणेची काळजी घेण्याचे महाविरणचे आवाहन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज उपकेंद्र, रोहित्र, विजेचे खांब किंवा विद्युतवाहक तारा अशा विद्युत यंत्रणेच्या जवळ फटाके फोडण्याचे टाळून विद्युत अपघात किंवा बिघाड होणार नाही. याची काळजी घेऊन दीपावली आनंदाने साजरी करावी. असे आवाहन जळगाव महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

दीपोत्सवाने दीपावलीचा सण साजरा केला जातो. जळगाव, धुळे आणि नंदूरबार या खान्देशी जिल्ह्यातही तो मोठ्या उत्सहात साजरा होतो. दीपोत्सव काळात फटाक्याची अतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. फटाके फोडताना त्याचा विद्युत यंत्रणेवर परिणाम होणार नाही, त्याबाबतची नागरिकांनी काळजी घेतल्यास विना – व्यत्यय आणि अखंडित – सुरळीत वीज पुरवठा देण्यास विद्युत यंत्रणेलाही सोयीचे होऊ शकते.

आपल्याकडे वीज वितरणाची रोहित्रे, खांब अशी यंत्रणा रस्त्याच्या लगत असते. दुदैवाने किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने बहुतांश ठिकाणी रोहित्राच्या शेजारी, विजेच्या खांबाजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली कचऱ्याचे ढिग साचल्याने दिसून येते. तशा स्थितीत बेजबाबदारपणे किंवा निष्काळजीपणाने फटाके फोडल्याने आग लागण्याची व त्यामुळे प्रवाहीत विद्युत यंत्रणा त्यास बळी पडून आपघात किंवा विद्युत यंत्रणा बिघाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातून वीज पुरवठा खंडित होऊन काही काळासाठी नागरिकांची गैरसोय होऊ शकते. फटाके फोडताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी रोहित्राजवळ, खांबाजवळ किंवा विद्युत वाहिन्यांखाली फटाके न फोडण्याचे आवाहन जळगाव महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content