Home Cities जळगाव जळगावात होणार महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन

जळगावात होणार महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील निर्यात क्षेत्राला चालना देणे, रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच जिल्ह्यांना निर्यातवाढीसाठी अधिक सक्षम व उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाच्या “District as Export Hub” (जिल्हा निर्यात केंद्र) या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या अनुषंगाने महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन–२०२६ चे आयोजन शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले असून, हे कन्व्हेन्शन हॉटेल कॉटेज प्रेसिडेंट, एमआयडीसी, जळगाव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

या कन्व्हेन्शनमध्ये निर्यात क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार असून, निर्यात संधी, शासकीय धोरणे, योजना, प्रक्रिया आणि जिल्हा पातळीवरील निर्यात वाढीच्या शक्यता याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे उद्योजक, निर्यातदार, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक वसाहती, शेतकरी उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योगातील उत्पादक तसेच केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound