जळगाव प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एजुकेशन संचलित मु. जे. स्वायत महाविद्यालयाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे सालाबादप्रमाणे ‘मेस्ट्रो’ (MAESTRO 2019-20) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदा हि स्पर्धा येत्या (दि.१० जानेवारी) रोजी आयोजित करण्यात आली आहे.
हि स्पर्धा म्हणजे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या चार स्पर्धा घेण्यात येणार आहे. जसे प्रश्नमंजुषा स्पर्धा, जाहिरात विकास स्पर्धा, पॉवरपॉईंट सादरीकरण स्पर्धा आणि ऑनलाईन स्टॉक मार्केट स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमानंतर ११ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान पार पडतील.
यांची राहणार उपस्थिती
सदर स्पर्धाचे समन्वयक अनुक्रमे गायत्री खडके, डॉ.विवेक यावलकर, हर्षला देशमुख आणि सी.ए.ए.एन.आरसीवाला हे आहेत .
‘मेस्ट्रो 2019-20’ या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी उदयोजक किशोर ढाके सोयो सिस्टिम आणि के.सी.ई.संस्थेचे प्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या वेळेस व्यासपीठावर स्पर्धेचे आयोजक सचिव आणि विद्याशाखेचे प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी.कुलकर्णी, स्वायत्त महाविद्यालयाचे प्रमुख डॉ.एस.एन.भारंबे, वाणिज्य विद्याशाखेचे संचालक सी.ए.वाय.ए.सैंदाणे, व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख सी.ए.ए.एन.आरसीवाला यांची उपस्थिती असेल.
असे असणार ‘बक्षिस’
तसेच प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे रु.३०००, रु.२००० आणि रु.१००० याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. बक्षीस समारंभासाठी स्वामी पॉलीटेकचे मालक सागर मंधान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘मेस्ट्रो’ स्पर्धेसाठी नाव नोंदणी
या स्पर्धेसाठी विद्याशाखेचे सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे इतर महाविद्यालयांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपले जास्तीत जास्त संघ स्पर्धेसाठी पाठवावेत. ‘मेस्ट्रो’ मधील सर्व स्पर्धाकरिता नाव नोंदणी सुरु झाली आहे आणि स्पर्धेच्या दिवशीसुद्धा सकाळी नाव नोंदणी करता येईल.