रावेर प्रतिनिधी । मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी रावेर रेल्वे स्थानकावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांची विविध ठिकाणी असलेल्या सुविधा व कामांची पाहणी केली.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांच्यासोबत डीआरएम विवेककुमार गुप्ता व अधिकाऱ्यांचा फौजफाटा मोठ्या संखेने उपस्थित होता. यावेळी स्टेशन अधिक्षक यांनी महाव्यवस्थापक संजय मित्तल व डीआरएम विवेककुमार गुप्ता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर त्यांनी नवीन बांधलेल्या कर्मचारी निवासस्थानांची पाण्याच्या टाकीची गॅगमॅन राहुल कोंगे यांच्या हस्ते उदघाटन केले. तसेच पाहणी सुध्दा केली यावेळी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधा संदर्भात विचारपूस करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
गाड्या थांब्याची मागणी
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, अमोल पाटील, विशाल पाटील, चंद्रकांत चौधरी, उमेश महाजन, प्रवासी संघटनेचे प्रशांत बोरकर, शशांक बोरकर, स्वप्निल पाटील यांच्यासह अप-डाउन करणारे प्रवाश्यांनी विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी दिल्या भेटी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल व डीआरएम विविक कुमार गुप्ता यांनी पाण्याच्या टोकीचे उदघाटन व कर्मचारी निवासस्थान, दुचाकी पार्किग व विद्यार्थी यांच्या योगाची पाहणी केली. तसेच वेटिंग हॉल, वृक्षरोपण मोहीम, महिला व पुरुष प्रतीक्षालय, रेल्वे सुरक्षा बलच्या कार्यालयाची उदघाटन केले. यावेळी स्टेशन अधिक्षक कार्यालयाची पाहणी सुध्दा केली.
अस्वच्छता तसेच निकृष्ट कामांच्या तक्रारी
स्टेशनाच्या उत्तरे कडील पाहणी करत असतांना महाव्यवस्थापक संजय मित्तल यांना एका गॅगमने निकृष्ट कामां संदर्भात तक्रार केली, अस्वच्छतेचा किती अभाव केला आहे, हे देखिल त्यांच्या लक्षात आणून दिला. यावेळी श्री मित्तल यांनी डीआरएम श्री गुप्ता यांना दखल घेण्याच्या सूचना केल्या