मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या आत्याच्या औषधीसाठी तालुक्यातील हलखेडा येथे आलेल्या मध्यप्रदेशातील तरूणाला खंडणीसाठी मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.
मध्यप्रदेशातील छिंडवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी असणारा एक तरुण बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे कर्करोगाचे औषध घेण्यासाठी गेला होता. गुरुवारी सकाळी तरुणाच्या मोठ्या भावाच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला की, त्यांनी लहान भावाला ओलीस ठेवले आहे. तरुणाला सोडण्याच्या मोबदल्यात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांची खंडणीही मागितली होती. पीडितेने तत्काळ अमरवाडा पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती एसपीपर्यंत पोहोचली. एसपींनी जळगाव एसपींशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी सायबरच्या मदतीने चोरट्यांपर्यंत पोहोचून तरुणाला अटक केली.
अमरवाडा येथील अनिकेत वंशकर यांनी तक्रार दिली की, त्यांचा लहान भाऊ १९ वर्षीय अमित वंशकर हा बुधवारी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या हलखेडा येथे कॅन्सरचे औषध घेण्यासाठी निघाला होता. गुरुवारी सकाळी त्यांच्या नंबरवर एक अनोळखी फोन आला की, अमितला ओलीस ठेवण्यात आले आहे. त्याच्या सुटकेसाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. छिंदवाड्याचे पोलीस अधीक्षक विनायक वर्मा यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. एसपी श्री वर्मा यांनी जळगावचे एसपी एम. राजकुमार यांच्याशी संपर्क साधला. यानंतर मुक्ताई नगर पोलिसांनी सायबरच्या मदतीने एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई पार पाडली.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणी बरसेन भोसले, नानसिंग पावरा आणि आशू पावरा या तिघांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी बरसेन भोसले यास अटक करण्यात आली असून दोघांचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, फिर्यादीत अमित बसकार यांनी आपण औषध घेण्यासाठी आलो असतांना तिघांनी मारहाण करत ५० हजार रूपयांची मागणी करत मारहाण केल्याचे नमूद केले आहे.