एम. फील पदवी कायमची बंद होणार !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | महाविद्यालयीन एम. फील पदवी कायमची बंद होणार आहे. यूजीसीने याबाबतचा खूप मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील पदवीसाठी प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी आता कायमची बंद होणार आहे. यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोर्ससाठी प्रवेश न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीने असा आदेश आज दिलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील पदवीसाठी प्रवेश अधिकृतपणे बंद होईल.

यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त पदवी नाही. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची पोस्टग्रॅज्युएट अ‍ॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने पदवीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश घेता येणार नाही.

 

Protected Content