जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्लेसमेंट सेलतर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आलेले होते.
लॉर्ड एस.पी. प्रा. कंपनी ली. मर्यादित तर्फे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांची निवड कंपनीतर्फे करण्यात आली.
या मुलाखतीसाठी बी. कॉम., एम.कॉम. तसेच बी.बी.ए. चे असे एकूण ३० विद्यार्थी उपस्थित होते.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्लेसमेंट सेलतर्फे रोजगाराच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
या मुलाखतीसाठी प्राध्यापक डॉ. ए.पी.सरोदे वाणिज्य विद्या शाखाप्रमुख, अब्दुल आरसीवाला व्यवस्थापन विद्या शाखाप्रमुख, प्लेसमेंट अधिकारी डॉ. विवेक यावलकर, डॉ. विशाल देशमुख, प्रा. नितीन चौधरी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.