जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.संचालित मू.जे.महाविद्यालायातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी म्हटले कि, विद्यार्थ्यांनी आपले वाचन वाढवावे जेणेकरून कंटेंट रायटिंग क्षेत्रात असलेल्या अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. चांगले लिखाण जर जमत असेल तर घरून सुद्धा काम करता येते. उत्कृष्ट लिखाणात कार्य करणाऱ्या अनेक नामवंतांची उदाहरणे त्यांनी दिली. यावेळी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख संदीप केदार, प्रशांत सोनावणे, केतकी सोनार यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर याच्या जीवन प्रवासाविषयी माहिती दिली.
यावेळी प्राचार्य ए.आर.राणे, प्रा संदीप केदार, दुष्यंत भाटेवाल, डॉ.जयश्री पाटील, डॉ.सुनीता ढाके, प्रा.निलेश जोशी, एम.एम.वनकर, मोहन चौधरी, प्रा.केतन चौधरी तसेच शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी व जनसंवाद व पत्रकारिता विभागाची विद्यार्थीनी दिक्षावले आदी उपस्थित होते. विभागाकडून ७ रोजी सकाळी १२ वाजता जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये संपादक व संपादकीय विभागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या जनसंवाद या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.