जळगाव प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे अभ्यास केंद्र मू.जे. महाविद्यालयात एम. लिब ॲण्ड इन्फॉर्मेशन सायन्स या वर्गाच्या तीन दिवसीय प्रकल्प शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पाचे उद्घाटन स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नॉलेज रिसोर्स सेंटर, नांदेडचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, ग्रंथालय विभागप्रमुख सूर्यभानजी पवार महाविद्यालय, नांदेडचे डॉ. अनिल कोळंबीकर, मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, महाविद्यालयाचे ग्रंथपाल व केंद्र संयोजक डॉ. व्ही. एस. कंची, सहायक ग्रंथपाल प्रा. आरती चौधरी हे उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रकल्प शिबिरात विद्यार्थ्यांना शोध निबंध व शोध प्रबंध तयार करणे संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्या राजहंस यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वर सोनगरे यांनी केले.या प्रकल्प शिबिरात या कोर्सला प्रवेशित सर्व विद्यार्थी उपस्थित होते.