मु.जे. महाविद्यालय परिसरातून लांबविली एकाची दुचाकी

 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसरातील पटांगणात पार्किंगला लावलेली व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत सुभाष पाटील (वय-३२) रा. जाकीर हुसेन सोसायटी, संत गाडगेबाबा, नगर महाबळ हे व्यापारीचे काम करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता एमजी कॉलेज परिसरात असलेल्या केसीई सोसायटीच्या पटांगणात त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीव्ही ००२८) पार्किंग करून लावली होती. पार्किंगला लावलेली २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुचाकीचा शोध सर्वत्र परिसरात घेतला मात्र मिळून आली नाही. अखेर शशिकांत पाटील यांनी सोमवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.

Protected Content