जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित असे नावे सांगणाऱ्या अनोळखी दोन जणांनी भुसावळ शहरातील तरुणीला पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ७९ हजार ७९४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील ओम पार्क येथे राहणारी ३२ वर्षीय तरुणी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजीपासून व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणाऱ्या अनोळखी दोन जणांनी तरूणीशी संपर्क साधून पार्ट टाइम जॉब देण्याचे आम्ही दाखविले. त्यानंतर फ्लाईट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित आणि निधी असे नावे सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.