जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद गावाजवळील राणे हॉटेल समोरील राष्ट्रीय महामार्गावर बुधवार १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास २२ चाकी असलेल्या ट्रालाच्या कँबिनमध्ये अचानक आग लागल्याने सुमार १६ लाख २० हजार किंमतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव ते नशिराबाद दरम्यानच्या हॉटेल राणे समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बुधवार १० जुलै रोजी सायंकाळी ५ वापता भुसावळकडून जळगावकडे जाणारा २२ चाके असलेला ट्रला क्रमांक (आरजे ५२ जीए ३१८१)च्या कॅबिनला अचानक आग लागली. यावेळी चालक तुलसीराम छोटेलाल मिना वय ४० रा. लक्ष्मणगड जि. अलवर राज्य राजस्थान यांनी जागेवरच वाहन थांबवून ट्राल्याच्या बाहेर उडी घेतली. ही आग कशामुळे लागली हे समोर आलेले नाही. या आगीमुळे ट्राला पुर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे १६ लाख २० हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगी प्रकरणी गुरूवार ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे हे करीत आहे.